कामोठे : रामप्रहर वृत्त
प्रोडिजी मॅथ गेम अ-थॉन या संस्थेतर्फे मुंबई व नवी मुंबई येथील शाळांमधील इ. पहिली ते इ. आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी गणित मूल्यांकन आणि शिकण्याचे व्यासपीठ या आधारित 19 जुलै 2021 ते 2 ऑगस्ट 2021 पर्यंत आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे (सीबीएसई) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी व शिक्षकांना पदक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवल्यामुळे टॉप प्रॉमिसिंग स्कूलची ट्रॉफी देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा प्रोडिजी मॅथ गेम अ-थॉन या संस्थेने गौरव केला. या स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल स्कूल कमिटीचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळा, स्पर्धेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार करून गौरव केला.