कर्जत : प्रतिनिधी
माथेरानमधील नागरिकांच्या मागणीनुसार कर्जत एसटी आगाराने गुरुवार (दि. 26) पासून मिनीबसच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कर्जत-माथेरान या मिनीबसच्या एकूण 10 फेर्या आहेत.
माथेरानसाठी कर्जत एसटी आगाराने मिनीबस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी चांगली सोय झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद होती, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर मिनीबस सेवा हळूहळू सुरू करण्यात आली. आता माथेरानच्या नागरिकांनी या मिनीबसचे वेळापत्रक सोईचे व्हावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी मिनीबसच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
मिनीबसचे वेळापत्रक
कर्जत – माथेरान
सकाळी 6.00, 8.30, दुपारी 12.05, 14.30, आणि संध्याकाळी 17.00
माथेरान – कर्जत
सकाळी 7.15, 9.45, दुपारी 13.20, 15.45, आणि संध्याकाळी 18.10