लखनौ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश सरकारकडून 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी 170 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली.
ओदिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे. यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे साहाय्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी त्वरित स्वीकारला, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले.
‘2024च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 10 कोटी रुपये, 2028च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 15 कोटी रुपये आणि 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 20 कोटी रुपये निधीविषयी या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पुरस्कर्त्यांची रक्कम फक्त नामांकित कुस्तीपटूंपुरती मर्यादित नसेल, तर कनिष्ठ गटातील कुस्तीपटूंनाही त्याचा फायदा होईल,’ असे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश राज्य सरकारसोबतच्या या नव्या करारानंतर कुस्ती महासंघ जेएसडब्ल्यू (गडथ) आणि ओजीक्यू (जॠट)सारख्या खाजगी स्वयंसेवी संस्थांना कुस्तीला पाठिंबा देण्याची परवानगी देईल का, हे पाहणे बाकी आहे. याबाबत विचारले असता सिंग म्हणाले की, सर्व दरवाजे खुले आहेत, पण त्यासाठी एक अट आहे. आम्हाला यापूर्वीही त्यांची गरज नव्हती, पण जर त्यांना सहकार्य करायचे असेल, तर त्यांचे स्वागत आहे. या कंपन्यांनी कुस्ती महासंघासोबत पारदर्शकता ठेवावी, अशी आमची इच्छा आहे. या कंपन्या कुस्तीपटूंशी गुप्त करार करू शकत नाहीत, जर त्यांना मदत करायची असेल, तर त्यांनी आमच्याबरोबर बसून योजना कराव्यात, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
Check Also
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …
RamPrahar – The Panvel Daily Paper