पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यातील कलश पूजन शुक्रवारी (दि. 27) उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या सोहळ्यास दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष हिरामण ठाकूर, पनवेल रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश शेडगे, हनुमान मंडळाचे खजिनदार भरत गावंड, शंकर ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, अर्जुन ठाकूर, हसुराम ठाकूर, संजय ठाकूर, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, बळीराम ठाकूर, अरुण ठाकूर, हसुराम म्हात्रे, बाळाराम ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, अजय पाटील, अविनाश म्हात्रे, सुनील पाटील, समाधन ठाकूर, नितेश शेडगे, युवा मोर्चा केळवणे पंचायत समिती विभागीय सुबोध ठाकूर, कपिल शेडगे, उमेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, दिघाटीतील मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे ही माझी तेव्हाही इच्छा होती. अखेर मंदिर पूर्ण झाले आणि सार्या गावाला आनंद झाला. गावचे देऊळ तीन वर्षे अर्धवट राहणे योग्य नाही हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. तुम्ही अपेक्षा ठेवली मी काही तरी केले पाहिजे, निश्चित करेन. कलश पूजन मी केले. आता काही वाटा माझा आहे तो मी पूर्ण करेन.