पनवेल ः वार्ताहर
एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल येथील दोन वनरक्षकांवर कारवाई केली आहे.
तक्रारदार याचे वडील व काका यांनी पनवेल तालुक्यातील करंबेळी येथील दळी भागात नं. 4 क्षेत्र 40-10 एकर जमिनीतून 29 गुंठे जागा वन विभाग शासकीय योजनेनुसार शनिवार महादू सपरा यांच्याकडून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतलेल्या जमिनीवर कुंपण बांधताना अडथळा न आणण्यासाठी तसेच तक्रारदारांनी दळी जमीन ही दोघा जणांना विकून त्याची दलाली केली आहे. त्या जमिनीवर तारेचे कुंपण घालण्याकरिता तसेच जमिनीवरील असलेली झाडे तोडताना कोणतीही कारवाई न करण्याकरिता तीन व्यवहार खरेदीदारांकडून प्रत्येकी 40 हजार रुपयांप्रमाणे एकूण एक लाख 20 हजारांची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपये लाच ठरली होती.
या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई येथे केल्यानंतर पथकाने पनवेल परिसरात सापळा रचून लाच स्वीकारणारे ज्ञानेश्वर गायकवाड (वय 36, वनरक्षक, पनवेल रेंज) आणि माधुरी पाटील (वय 26, वनरक्षक संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभाग, पनवेल) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भ.प्र.का.सन 1988 (संशोधन 2018)चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.