शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेतकर्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी उपयुक्त आहे. या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 1982-83 पासून राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
नवीन विहीर- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 250,000/-, जुनी विहीर दुरुस्ती- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 50,000/-, इनवेल बोअरिंग- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 20,000/-, पंप संच- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 25,000/-, वीज जोडणी आकार- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 10,000/-, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 1,00,000/-, सूक्ष्म सिंचन संच- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- ठिबक- 50,000/-, तुषार- 25,000/-
या योजनेंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरूपात द्यावयाचा आहे. खालीलपैकी एका पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. नवीन विहीर- नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज- जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग बाब- शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- ठिबक- 50,000/, तुषार- 25,000/- शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज : शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संप ज्या शेतकर्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकर्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील. सोलरपंपासाठी अनुदान : जर शेतकर्यास महावितरण कंपनीकडून सोलरपंप मंजूर झाला असेल, तर पंपसंच व वीजजोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु. 35 हजार) लाभार्थी हिश्शाची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.
वरील घटकांपैकी लाभार्थ्याकडे काही घटक उपलब्ध असतील, तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक घटकांची निवड करावी. पंपसंच, वीजजोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे, शेतकर्याकडे सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे, शेतकर्याकडे त्याच्या स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे, शेतकर्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे, लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे, दारिद्य्ररेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य, दारिद्य्ररेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000 पेक्षा जास्त नसेल, तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) यादीत अंर्तभूत शेतकर्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही, परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/-चे मर्यादेत आहे अशा शेतकर्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून मागील वर्षाचा उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेऊन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
जिल्हा निवड समिती- पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद कार्यालयास शिफारसीसह प्राप्त होणार्या पात्र अर्जदारांच्या तयार केलेल्या यादीमधून लाभार्थ्याची निवड अंतिम करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना याच आर्थिक वर्षाच्या कालावधीत योजनांतर्गत मंजूर विविध घटकांचा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध अनुदान मर्यादेत व प्रती लाभार्थी विहित उच्चतम अनुदान मर्यादेत लाभ द्यावयाचा आहे.
नवीन विहीर- नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणार्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र, राज्य, जिल्हा परिषद निधीतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा, तसेच यापूर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहिरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्याच्या 7/12 वर, तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
जुनी विहीर दुरुस्ती : जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणार्या अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांच्या 7/12 वर विहिरीची नोंद असावी विहिरीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा अधिक रक्कम लागल्यास लाभार्थीने स्वतः उभी करावयाची आहे.
इनवेल बोअरींग : नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु. 20 हजाराच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. इनवेल बोअरींगचे काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता (ऋशरीळलळश्रळीूं ठशिेीीं) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावा.
पंपसंच : पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी पंपसंच खरेदीकरिता कृषी विकास अधिकारी यांनी पूर्वसंमती घ्यावी. लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा अशा शेतकर्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रीतसर तपासणी (ींशीींळपस) करून ते सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (ीींरपवरीवी) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकर्याने खरेदी करावयाची आहे.
वीज जोडणी आकार : नवीन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणार्या लाभार्थ्यांने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. लाभार्थ्यांनी सादर केलेल्या पावतीनुसार विद्युत वितरण कंपनीकडे खातरजमा करून कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात कृषी विकास अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे विहित अनुदान मर्यादेत अनुदान वर्ग करण्यात येईल.
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण : ज्या शेतकर्यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणार्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणार्या अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांना शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेता येईल.
सूक्ष्म सिंचन संच : सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांना सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणार्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती पुढीलप्रमाणे, लाभार्थी निवडीचे निकष पूर्ण करणार्या अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. अर्ज भरण्याची सुविधा कृषी विभागाच्या ुुु.ज्ञीळीहळ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील हीींिीं://रसीळुशश्रश्र.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या साईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या अर्जदाराने ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत ग्रामसभेच्या शिफारशीने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी (वि.घ.यो) पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावा, जिल्ह्यांच्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त परिपूर्ण अर्जातून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येईल, वैयक्तिक लाभार्थी निवडताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
-विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई