Monday , January 30 2023
Breaking News

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल ‘सुवर्ण’धमाका

टोकियो ः भारतीय नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय भारताच्या योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले. दोन वेळचा सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाने या वेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर मोहोर उमटवली, तर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या सातवर पोहचली. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये यश मिळविणार्‍या विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक काढून घेण्यात आले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply