Breaking News

मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार!; पनवेलसह राज्यात शंखनाद आंदोलन; मंदिरे खुली करण्याची भाजपची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोनाचे निमित्त करीत हिंदू धर्मातील सण-उत्सवांचे महत्त्व कमी करण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे मंदिरे खुली करण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी (दि. 30) भाजपच्या वतीने राज्यस्तरीय शंखनाद आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आरती करून देवाला साकडे घालण्यात आले. राज्यातील मंदिरे बर्‍याच काळापासून बंद आहेत. ती उघडण्यात यावीत यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी राज्यभरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत दारूच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. हॉटेल, बारही सुरू करण्यात आले आहेत, मात्र मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे बंद ठेवण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करून भक्तीचे दार उघडा, अशी जोरदार मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, गुरुनाथ लोंढे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेविका रूचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, संजय जैन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, रवी नाईक, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, नीता मंजुळे, अक्षया चितळे, अंजली इनामदार, श्रुती मराठे, चंद्रकांत मंजुळे, महेंद्र गोडबोले, केदार भगत, गौरव कांडपिळे, आकाश भाटी, राजन पेठे, देवांशु प्रभाले, कादीर शेख, कर्वे गुरुजी, समीर ओझे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कोरोनाचा प्रादूर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जनजीवन जवळपास पूर्ववत सुरू झाले आहे. ठाकरे सरकारने मांस, मदिरा सर्व काही सुरू केले, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ला बंदिस्त करून ठेवले आहे. लोकभावनेचा विचार न करता हम करो सो कायद्याने राज्यातील सरकार कारभार करीत असून धार्मिक स्थळे व मंदिरे खुली झालीच पाहिजेत. या वेळी ‘मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार’, ’मंदिर बंद गरिबांचे हाल, ठाकरे सरकार मालामाल’, ’भक्तों को जेल मंदिरोंपर ताला, उद्धव सरकार मे शराब का बोलबाला’, अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

-ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत

मंदिरे खुली करण्यासंदर्भात केंद्र सरकारने 4 जून 2020 रोजीच परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरूदेखील झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम, अटी-शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची, तसेच भजन, कीर्तन व पूजन करू देण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांकडून होत आहे, मात्र पुनश्च ‘हरीओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. या सरकारला जागे करण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा आंदोलन केले.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply