Breaking News

मोठा खांदा येथील रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष मोठा खांदा आणि पवन पुत्र महिला मंडळ यांच्या वतीने सलग तीन वेळा आमदार म्हणुन तसेच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी

(दि. 1) मोठा खांदा येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. डॉक्टर डी. वाय. पाटील हॉस्पिटल रक्तपेढी, नेरुळ यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरास पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका अलका भगत, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉ. नायर मॅडम, समाजसेविका अरुणा भगत, गिता भगत, शारदा कावळे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply