Breaking News

थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सातार्‍यातील पाचगणी येथे आयोजित 16व्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेतील खेळाडूंनी पनवेल शहर थाई बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली.
अथर्व मसुरकर आणि स्मित पाटील यांनी सुवर्णपदक, तर पंक्ती पाठक आणि आर्यन बंगेरा रौप्यपदक पटकाविले. विजेत्या खेळाडूंची 24 ते 26 सप्टेंबर रोजी गोव्यात होणार्‍या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, टेक्निकल डायरेक्टर शिहान चिंतामणी मोकल यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे खेळाडू खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेत सेन्सेई प्रतिक कारंडे यांच्याकडे थाई बॉक्सिंग आणि इतर मार्शल आर्टस्चे धडे घेत आहेत.

Check Also

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील आई मरिआई मित्र मंडळ रोहिदासवाड्याच्या वतीने आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply