Monday , February 6 2023

त्सित्सिपास, सबालेंकाची विजयी सलामी

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

न्यूयॉर्क ः वृत्तसंस्था
ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि बेलारुसची आर्यना सबालेंका या मानांकित खेळाडूंना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयारंभ करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. जपानच्या नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये यशस्वी पुनरागमन केले, मात्र ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.
आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या पुरुष एकेरीतील लढतीत तिसर्‍या मानांकित त्सित्सिपासने मरेवर 2-6, 7-6 (9-7), 3-6, 6-3, 6-4 अशी पाच सेटमध्ये सरशी साधली.
अन्य लढतींमध्ये रशियाच्या दुसर्‍या मानांकित डॅनिल मेदवेदेवने रिचर्ड गॅस्क्वेटला 6-4, 6-3, 6-1 अशी धूळ चारली. स्पेनच्या 18व्या मानांकित रॉबटरे बॉटिस्टाने संतापलेल्या निक किर्गियोसवर 6-3, 6-4, 6-0 असे वर्चस्व गाजवले. रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हने इव्हो कालरेव्हिचवर 6-3, 7-6 (7-3), 6-3 असा विजय मिळवला.
महिलांमध्ये दुसर्‍या मानांकित सबालेंकाने निना स्टोजॅनोव्हिचवर 6-4, 6-7 (4-7), 6-0 अशी मात केली. तिसर्‍या मानांकित नाओमी ओसाकाने मेरी बौझकोव्हाला 6-4, 6-1 असे सहज पराभूत केले. जून महिन्यात फ्रेंच स्पर्धेतील पहिल्या फेरीतील विजयानंतर मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांमुळे माघार घेणार्‍या ओसाकाचा हा त्यानंतर पहिलाच ग्रँडस्लॅम विजय ठरला. याशिवाय फ्रेंच विजेत्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने अस्त्रा शर्माचा 6-0, 6-4 असा फडशा पाडला. अमेरिकेच्या किशोरवयीन कोको गॉफने मॅग्डा लिनेटला 5-7, 6-3, 6-4 असे नमवले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply