Breaking News

गुरुवारपासून भारत-इंग्लंड चौथी कसोटी

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी

लंडन ः वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवार (दि. 2)पासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
प्रसिध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतले होते.
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे, तर पहिला सामना अनिर्णित ठरला होता.
संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply