बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी
टोकियो : वृत्तसंस्था
नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धांची विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या एसएल-3 श्रेणीतील ‘अ’ गटाच्या सामन्यात भगतने भारताच्याच मनोज सरकारचा पराभव केला. युवा पलक कोहलीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
नेमबाज अवनी लेखाराचे बुधवारी 10 मीटर एअर रायफल प्रोन मिश्र क्रीडा प्रकारात पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे, तर पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेतून भारताच्या अमित कुमार आणि धरमवीरचे आव्हान संपुष्टात आले.