Breaking News

सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे सतिष म्हस्कर बिनविरोध

रसायनी ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 4) झाली. या वेळी भाजपचे सतिष म्हस्कर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सरपंच म्हस्कर यांचे अभिनंदने केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कांता कांबळे, सदस्य प्रशांत माळी, सुनील माळी, सुरेखा कुरंगळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभुळकर, माजी सरपंच संतोष माळी, शिवाजी माळी, अविनाश गाताडे, बळीराम कांबळे, एम. डी. माळी, सदाशिव माळी, सीताराम माळी, रामचंद्र माळी, रघुनाथ माळी, परशुराम माळी, अंकुश झिंगे, महादेव जांभुळकर, विजय कुरंगळे, सुदाम भंडारकर, बी. डी. भिंगारकर, निलेश माळी, गाव अध्यक्ष संदीप माळी, युवा मोर्चा अध्यक्ष ओमकार माळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र केदारी, रामचंद्र म्हस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply