सासरच्या नऊ जणांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
माणगाव : प्रतिनिधी
विवाहितेचा मानसिक छळ व मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नऊ जणांवर गोरेगाव (ता. माणगाव) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा गोरेगावकर यांचे लग्न 2015 मध्ये अर्जुन बाळाराम गोरेगावकर (वय 32, रा. विद्यानगर लोणेरे, ता. माणगाव) यांच्याबरोबर झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी छोट्या छोट्या कारणांवरून सुरेखाचा तिच्या सासरच्या लोकांकडून मानसिक छळ व शारिरीक छळ सुरू झाला. 2015 पासून ते 29 ऑगस्ट 2021 या कालावधीत सुरेखाचा छळ सुरू होता. त्याला कंटाळून सुरेखा हिने दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात पती अर्जुन गोरेगावकर (वय 32), सासरे बाळाराम गोरेगावकर (वय 65), दीर भीमराव गोरेगावकर (वय 50), जाऊ वैशाली गोरेगावकर (वय 45), नणंद रजनी खामगावकर (वय 55), पुतणी सोनिया गोरेगावकर (वय 24), पुतणी स्नेहल गोरेगावकर (वय 23), सावत्र मुलगा आदश गोरेगावकर (वय 20), सावत्र मुलगा आकाश गोरेगावकर (वय 21) यांच्यावर भादंवि कलम 498(अ), 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला हवालदार एम. जी. टेमकर या करीत आहेत.