Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार प्रारंभ

सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने यांची विशेष उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा शुक्रवारी (दि. 28) सकाळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शानदार प्रारंभ झाला.
नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून महाअंतिम  फेरीला सुरुवात झाली. उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने, सहप्रायोजक नील ग्रुपच्या कल्पना कोठारी आदी उपस्थित होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे एक फक्त सांस्कृतिक व्यासपीठ नसून कलाकार निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे सांगून नगरसेवक अनिल भगत म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर हे लोकांना एक व्यासपीठ कसे निर्माण करता येईल असा विचार करून कार्यरत असतात. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सर्वव्यापी विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या व्यासपीठामार्फत केले जाते. आपली सगळ्यांची साथ आम्हाला अशीच राहील आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या मदतीने आम्ही पुढे वाटचाल करीत राहू.
मुंबईतील प्रमुख थिएटर्सच्या ‘तिडीक’ या एकांकिकेच्या प्रयोगाने स्पर्धेच्या महाअंतिम स्पर्धेला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभरात नऊ एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच नाट्यगृहात प्रवेश दिला जात आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply