मुंबई ः प्रतिनिधी
येत्या 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत राज्यात बर्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात राहणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टी होईल, असे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून म्हटले आहे. दरम्यान, या पाच दिवसांच्या काळात ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …