Breaking News

महावितरणची कर्जतमध्ये थकबाकीदारांवर कारवाई

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील वीज महावितरण विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली असून, कर्जत तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांना आपली वीजजोडणी कापली जाण्याची भीती वाटू लागली आहे.

कर्जत तालुक्यात 76 हजार वीजग्राहक असून त्यातील असंख्य ग्राहकांकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे. 9 कोटी 50 लाखांची थकबाकी वीजग्राहकांकडे असल्याने महावितरण कार्यालयाने तालुक्यातील पाच हजार 200 ग्राहकांच्या वीजजोडणी तोडून टाकल्या आहेत. त्यांचे मीटर कापून त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या कडक कारवाईमुळे वीजग्राहकांत ऐन सणाच्या काळात वीजजोडणी तोडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील साडेनऊ हजारांहून अधिक नादुरुस्त विजेचे खांब बदलण्याची गरज आहे. त्यासाठी तालुक्यातील वीज थकबाकी अल्प प्रमाणात असली पाहिजे. तरच इन्फ्रा विभाग खांब बदलण्यासाठी निधी देऊ शकेल, मात्र वीज थकबाकी वसुली होण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन महावितरणचे कर्जत येथील सहायक अभियंता प्रकाश देवके यांनी केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply