पुणे ः प्रतिनिधी
इंदापूर (जि. पुणे) येथे नुकतीच 23 वर्षाखालील फ्री-स्टाईल निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धेत पैलवान सौरभ इगवे, सुरज कोकाटे, सौरभ पाटील, रविराज चव्हाण, प्रथमेश गुरव, सुरज शेख , बाळू बोडके, ओंकार जाधवराव, सुनील खताळ, आदर्श गुंड यांची निवड झाली. हा संघ 16 ते 19 सप्टेंबरदरम्यान अमेठी (उत्तर प्रदेश) येथे होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.