Breaking News

निकम स्कूलचे वूशू स्पर्धेत यश

माणगाव ः प्रतिनिधी

खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत माणगावमधील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये रूद्र चव्हाण, तनश्री सावंत, आयुष मोरे, प्रसाद मालोरे यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर  अभिषेक पडळकर याने रौप्यपदक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मंदार चवरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे माणगाव एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोकाटे, को-ऑर्डिनेटर विजय पाईकराव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply