पनवेल ः प्रतिनिधी
येथील महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना लसीकरणाचे नवनवे उच्चांक होत आहेत. महापालिकेने सोमवारी एकूण पाच लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर मंगळवारी (दि. 7) एकाच दिवशी 10 हजार 982 लसींचे डोस दिले.
कोरोनाविरोधातील लढा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. याआधी एका दिवसात पाच हजार लसी दिल्या जात होत्या. हा विक्रम मोडीत काढून मंगळवारी जवळपास 11 हजार जणांना लस देण्यात आली, तर बुधवारी एका दिवसात 15 हजार लसींचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर हा विक्रमही मोडीत निघेल.
दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली असून ग्रामीण भागात 67 लसीकरण केंद्र नव्याने सुरू केली आहेत, तसेच शहरी भागातही नवीन लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …