मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचा सवाल
मुंबई ः प्रतिनिधी
‘आरोग्य केंद्र बंद करून राज्यातील मंदिरे उघडू का,’ असा सवाल विरोधकांना करणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने आता प्रतिसवाल केला आहे. ‘राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?,’ असा सडेतोड सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
‘मंदिरे आणि आरोग्य मंदिरे या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता दाखवताहेत. राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? याचे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा तुमच्या सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशन या सगळ्याच्या पुरवठ्यात कट कमिशनची प्रकरणे समोर येताहेत. त्यावर तुम्ही कधी भाष्य करणार? आरोग्य केंद्र हवीच, पण कट कमिशनवर नको, ही आमची भूमिका आहे, असे शेलार म्हणाले.