कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय सेलच्या माध्यमातून कर्जत पूरग्रस्तांना टीटीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत.
उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरातील अनेक घरांत घुसून मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त भागात भाजप वैद्यकीय सेल तर्फे टीटी इंजेक्शन देण्याचे कॅम्प आयोजित केले जात आहेत. वैद्यकीय सेल तालुका संयोजक डॉ. भगवान कराळे, सहसंयोजक राहुल कुलकर्णी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या देखरेखीखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप शहराध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, विजय जिनगरे, रायगड जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष मंदार मेहेंदळे, भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी, नगरसेविका स्वामींनी मांजरे, सुमन यादव, समीर सोनी तसेच प्रशांत उगले, मारुती जगताप मनीषा धुमने यांच्या उपस्थितीत हे कॅम्प सुरू आहेत.
कर्जत शहरातील पूरग्रस्त शनिमंदिर परिसरातील 37, प्रभाग पाचमधील 54 आणि प्रभाग दोन येथे 95 नागरिकांना टीटीची इंजेक्शन्स मोफत देण्यात आली.