Breaking News

‘रोटरी’तर्फे आदिवासी कुटुंबाना गणेशोत्सवानिमित्त साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

गणपती उत्सव हा आपण अतिशय उत्साहाने साजरा करीत असतो, पण आपल्या समाजातील काही घटक आर्थिक अडचणीमुळे हा सण साजरा करू शकत नाही. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने अशाच 37 आदिवासी कुटुंबाना गणेश मूर्ती, पूजेचे सामान व विसर्जनापासून संपूर्ण खर्च करून त्यांना हा सण साजरा करण्यास मदत करण्यात आली. तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले.

साहित्याचे वाटप केल्यानंतर आदिवासींच्या चेहर्‍यावर हास्य पाहून खुप समाधान झाले, असे रोटरीच्या सदस्यांनी या वेळी सांगितले. या उपक्रमासाठी सर्व खर्च डॉ. दिपक खोत (मेंमबरशिप डायरेक्टर) यांनी केला. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे प्रेसिडेंट रवी नाईक आणि सर्व सदस्यांनी डॉ. खोत यांचे आभार मानले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply