Breaking News

कोतवाल खुर्द येथील नवसाच्या गणपतीचे विसर्जन

पोलादपूर तहसीलदारांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कोतवाल खुर्द गावातील उतेकर, सकपाळ परिवाराच्या नवसाच्या गणपतीचे दुपारी विसर्जन करण्यात आले. या गणेशोत्सवाचे यंदा 101 वे वर्ष असल्याने संपूर्ण उतेकर, सकपाळ परिवार या वेळी उपस्थित होता. तत्पुर्वी पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांच्याकडे तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे एक युनिट भेट देण्यात आले.

पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द येथे उतेकर, सकपाळ कुटूंबियांची वस्ती आहे. गणेशोत्सव ते आळीपाळीने उत्साहात व एकोप्याने साजरा करतात.  यंदा 101 व्या वर्षानिमित्त उतेकर, सकपाळ कुटूंबियांनी मोठ्या स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. या गणेशमुर्तीचे दुपारी विसर्जन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिप्ती देसाई, नायब तहसीलदार शरद आडमुठे, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिंदे, उतेकर सकपाळ परिवारातील सदस्य व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेप्रवीण दरेकर यांचे स्वीय सचिव राहुल सकपाळ उपस्थित होते. या वेळी पोलादपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे एक युनिट भेट दिल्याबद्दल तहसीलदार दिप्ती देसाई यांनी उतेकर, सकपाळ कुटूंबियांना धन्यवाद दिले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply