नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबई विभागीय कार्यालयात दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्यास सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. मंगळवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
विभागीय प्रमुख अनिल जाधव व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह तथा बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. दास यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले. या वेळी कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त हिंदी भाषेचा वापर करण्याचा संकल्प विभागीय व्यवस्थापक अनिल जाधव व सर्व कर्मचार्यांनी केला.
अनिल जाधव यांनी या वेळी सांगितले की, आपण दैनंदिन कामकाजामध्येक सरल, सहज हिंदी शब्दांचा प्रयोग केला पाहिजे. आपण ज्या भाषेमध्ये बोलत आहोत ती भाषा समोरच्या व्यक्तीस समजली पाहिजे, तरच संभाषण प्रभावी होईल. या वेळी उप व्यवस्थापक (वसूली) अरविंद कुमार उपस्थित होते.
हिंदी महिन्यामध्ये हिंदी निबंध, हिंदी सुलेख, हिंदी टंकलेखन, बँकिंग शब्दावली, आंतरिक कामकाज में हिंदी आणि ऑनलाइन बँकिंग व राजभाषा ज्ञान घेण्यात आले. आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्माणनित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) रमेश साखरे गच्छी यांनी केले. त्यानंंतर हिंदी महिना आणि हिंदी दिवसाचे समाप्त घोषित करण्यात आली.