अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांंमध्ये काँग्रेसच्या मतांचा फायदा घेऊन काही लोक सत्तेत गेले. नंतर मात्र काँग्रसला विसरले. त्याचे शल्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. आता तसे होऊ देणार नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांच्याशी जशास तसे वागणार. आघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबरच आता शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे, असा इशारा काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता दिला.
महेंद्र घरत मंगळवारी (दि. 21) अलिबाग येथे आले होते. त्यांनी स्थानिक काँग्रेस संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या तसेच काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा परिषदेत सत्ता मिळवताना काँग्रेसचा पाठिंबा घेतला, पण काँग्रेसला एकही सभापतीपद दिले नाही. काँग्रेसच्या मदतीने खासदार झाले, आमदार झाले, सत्ता मिळविली. नंतर मात्र काँग्रेसला विसरले. त्याचे शल्य काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे यापुढे जो काँग्रेेसला फसवेल त्याच्याशी जशास तसे वागणार. यापुढे कुणी सांगितले म्हणून आघाडी करणार नाही. आता आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही शिवसेनेशीदेखील युती करू शकतो. आम्हाला कुणी गृहित धूरन चालू नये, असे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले.
माजी जिल्हा अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर, प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, हर्षल पाटील, कृष्णा भोपी, कविता ठाकूर, ताई गडकर, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, उल्लास वाटकरे, हेमराज म्हात्रे, सुदाम पाटील, प्रभाकर राणे आदी या सभेला उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …