Breaking News

कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढतेय; पोदी, तक्का, काळुंद्रे व भिंगारीत भाजप नगरसेवकांच्या प्रयत्नाने केंद सुरू

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीत पोदी, तक्का, काळुंद्रे व भिंगारी येथे आठवड्यातून एकदा कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. नवीन पनवेलमधील पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मंगळवार (दि. 21)पासून त्याची सुरुवात करण्यात आली. नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे व अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नाने ही केंद्र सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.पनवेल महापालिकच्या प्रभाग 20 आणि 17मधील वाढती लोकसंख्या पाहता लस घेण्यासाठी यूपीएचसी-3मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. टोकन घेण्यासाठी पहाटेपासून रांग लागत असल्याने नोकरी करणार्‍यांना व ज्यांचे पोट हातावर आहे अशांना लस मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ व तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांना पत्र देऊन पोदी, तक्का, काळुंद्रे व भिंगारी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही त्याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केल्याने मंगळवारपासून पोदीवरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी 165 जणांना पहिला डोस व 57 जणांना दूसरा डोस देण्यात आला. या वेळी प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा तसेच किशोर मोरे, शैलेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि काळुंद्रे येथील शंकर म्हात्रे यांनी पोदी येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. दर सोमवारी काळूंद्रे, मंगळवारी पोदी, शुक्रवारी भिंगारी आणि शनिवारी तक्का येथे लसीकरण करण्यात येणार आहे.

माझ्यासारख्या महिलांना घरातील कामावर जाणार्‍यांचे डबे बनवायचे सोडून कोरोना लस घेण्यासाठी कूपन घ्यायला पहाटे रांगेत उभे राहणे शक्य होत नव्हते. नवीन पनवेलमधील पोदीवरील  शाळेत कोरोनाची लस देण्याची सोय करण्यात आल्याने मला कोरोनाची लस घेणे शक्य झाले आणि वेळही वाचला. त्याबद्दल नगरसेविका चारुशीला घरत यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. -वैशाली पाटील, गृहिणी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply