अलिबाग : प्रतिनिधी
सचिन गुंजाळ यांच्या प्रशासकीय बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर अतुल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 21) पदाची सूत्रे स्वीकारली.
अतुल झेंडे यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यात माणगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले होते.
अतुल झेंडे यांनी सचिन गुंजाळ यांच्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे स्वागत केले. सचिन गुंजाळ यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.