Breaking News

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून होणार सुरू

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यासदेखील शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत, मात्र असे असले तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात कलाकार व या क्षेत्राशी निगडीत असलेल्या कर्मचार्‍यांनी मागील महिन्यात ठिकठिकाणी आंदोलने केले होते.
कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा येथे झालेल्या बैठकीत शनिवारी (दि. 25) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्यक्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply