कर्जत ः बातमीदार
कर्जत येथील प्रतिक चंद्रशेखर जुईकर याने रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक जुईकर हा मूळचा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारा आहे. कर्जत तालुक्यातील कोल्हारे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचा तो सुपूत्र. पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धी असलेला प्रतिक दहावीच्या परीक्षेत कर्जत तालुक्यातून पहिला आला होता. पुढे त्याने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि तो बीटेक झाला. त्यानंतर नोकरी करीत असताना मित्रांपासून प्रेरणा घेत प्रतिकने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि अथक परिश्रमाअंती आयएएस अधिकारी होण्याची आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली.
एका शेतकरी कुटुंबातील आणि आगरी समाजातील शिक्षकाचा मुलगा आयएएस झाल्याचा आनंद व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश फिरत आहेत.
Check Also
खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …