मुरूड : प्रतिनिधी
रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी यांत्रकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिराचे आयोजन गावागावात करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो शेतकर्यांनी सहभाग नोंदवला.
या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सरदेसाई यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना, शेतकर्यांनी कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण हेक्टरी दोन किलोवॅटपर्यंत वाढविणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे, शेतकरी अनु. जमाती, तसेच महिला शेतकरी 50 टक्के इतर वर्गासाठी 40 टक्के अनुदान राहील.कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेतून कृषी यंत्र, अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. जसे ट्रॅक्टर, पॉवर लिटर, चलित अवजारे, मनुष्य चंलित यंत्र, अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे याबाबतची सविस्तर माहिती दिली.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा, कर्कनी यंत्र, फळबाग लागवड, त्याचबरोबरwww.mahadbt.com पोर्टल या मार्गदर्शनाबरोबरच रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यक्रमासंदर्भात योगेश मेंडाकर यांनी माहिती दिली.