कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ-शेलू रेल्वेस्थानकात कमर्शियल सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून मध्य रेल्वेमध्ये काम करणार्या कर्मचारी आणि अधिकारीवर्गामधून सर्व विभागात उत्कृट सेवा देणार्या कर्मचारी अधिकारी यांना डीआरएम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. गेली 12 वर्षे मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील विविध स्थानकात कमर्शियल विभागात सुपरवायझर म्हणून काम करणारे मंगेश दळवी यांना या वर्षीचा डीआरएम पुरस्कार मिळाला आहे.
मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील शेलू-नेरळ येथे कमर्शियल सुपरवायझर असलेले मंगेश दळवी यांना मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय यांच्या हस्ते डीआरएम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दळवी यांच्या या कामगिरीबद्दल शेलू-नेरळ-कर्जत विभागात कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांचे फोन तसेच सोशल मीडियातून अभिनंदन केले.