Breaking News

रणजीतसिंह डिसले यांचा भाजपकडून सत्कार

विधान परिषदेसाठी शिफारस करू : दरेकर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 5) सोलापूरमध्ये जाऊन डिसले यांचा सत्कार केला.
इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. त्यांची विधान परिषदेच्या 12पैकी एका जागेसाठी शिफारस करू तसेच राज्याच्या विधिमंडळामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
या वेळी दरेकर यांनी रणजीतसिंह डिसले यांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. फडणवीस यांनीही डिसले यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरेकर यांच्यासोबत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, नगराध्यक्ष असीफ तांबेळी, तालुका अध्यक्ष मदन दराडे आदी उपस्थित होते.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply