Breaking News

उरणमधील भाजपच्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
कोविड-19 या वैश्विक महामारीशी लढताना रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा उरण तालुकाच्या वतीने शहरातील तेरापंथी सभागृहात रविवारी (दि. 26) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 111 जणांनी रक्तदान केले. उरण तालुका भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँकेच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभाग प्रमुख शहानवाज मुकादम, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहराध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, चिटणीस चंद्रकांत घरत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जसीम इस्माईल गॅस, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मुकुंद गावंड, दीपक भोईर, सरचिटणीस सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष संपूर्णा थळी, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका जान्हवी पंडित, आशा शेलार, स्नेहल कासारे, व्यापारी सेलचे संयोजक हितेश शाह, अजित भिंडे, मनोहर सहातिया, हस्तीमल मेहता, कुणाल शिसोदिया, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, युवा कार्यकर्ते कल्पेश म्हात्रे, सुरज ठवले, अविनाश भोईर, प्रीतम पाटील, विशाल पाटेकर, प्रमोद म्हात्रे, परशुराम म्हात्रे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सदानंद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, प्रसाद मांडेलकर, बाबुलाल सांखला आदी उपस्थित होते.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply