Monday , January 30 2023
Breaking News

गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप

पनवेल : हुवेई कंपनीच्या वतीने आणि पनवेल पोलिसांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील 585 गरजवंत कुटुंबांना मदतीचा हात म्हणून शहरातील सिंधी पंचायत सभागृह, गोखले सभागृह व पळस्पे बिट परिसर येथे जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपही करण्यात आले.

परिमंडळ 2चे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, निरीक्षक विजय कादबाने, सहाय्यक निरीक्षक हुलगे आदींच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply