Tuesday , February 7 2023

हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या प्रतिमेचे कडावमध्ये अनावरण

कडाव : प्रतिनिधी

हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. 25) कडाव ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती भिमाबाई पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांची प्रतिमा कडाव ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यापुर्वी माजी उपसरपंच किसन पवार यांनी केली होती. त्यानुसार हुतात्मा दिनाचे औचित्य साधून कडाव ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांची प्रतिमा लावण्यात आली. त्याचे अनावरण  भिमाबाई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच अशोक पवार, माजी सरपंच किसन पवार, शाम पवार, महादेव कोळी संघटनेचे सोमनाथ वाघमारे, कृष्णा वाघमारे, पोलीस रेवतीताई ढोले, किसन वाघमारे, लहु ढोले, गणेश हिलम, शंकर पवार, मंगेश भोई, रवी भोई, पांडुरंग भोई, गणेश मुकणे, सविता पवार, नितीन पवार, नामदेव हिलम, मनोहर हिलम, चंद्रकांत हिलम यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply