Breaking News

पनवेलमध्ये शनिवारी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर

* किमान एक हजार मुलींचे होणार लसीकरण

* केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार्‍या या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या लसीकरणाचा लाभ युवतींनी घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते. ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या हाय रिस्क प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. म्हणूनच या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ 11 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलींना घेता येणार असून किमान एक हजार मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सेवा व समर्पण अभियानांतगर्र्त उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार सदैव गरीब, वंचित, दलित, आदिवासी, मागास आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. अनेक दशकानंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकारमुळे ऐकला जात असून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे सरकार सात्यत्यपूर्ण काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र यांच्या वाढदिवसापासून (17 सप्टेंबर) ते 7 ऑक्टोबर या काळात सेवा व समर्पण अभियान अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीब वस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळे वाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबीर, धान्य वाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदीसफाई अभियान आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून अखंडपणे सेवा केली जात आहे. या सेवा व समर्पण अभियान अंतर्गत युवतींच्या दृष्टिकोनातून गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply