Tuesday , February 7 2023

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी मानले आभार

पनवेल मनपा मुख्यालयात होणार पत्रकार कक्ष

नवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे गुरुवारी
(दि. 30) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.
पनवेल महापालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 16, क्षेत्रफळ 20086 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोकडून प्राप्त झाला आहे. या भूखंडाकरिता महापालिकेने 25 कोटी 54 लाख 72 हजार 701 रुपये सिडकोला अदा केले असून हा भूखंड पनवेल महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे.
या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च 280 कोटी रुपये अपेक्षित आहे.
या प्रस्तावित इमातीत तळघर, तळमजला, सहा मजले व सहावा वरचा मजला, तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी आणि अद्ययावत पत्रकार कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी आभार मानले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, साहिल रेळेकर, राज भंडारी, हरेश साठे, विशाल सावंत, असीम शेख, अनिल राय आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी व सुलभ कामकाजाकरिता पनवेल महापालिकेचे सर्व सोयीसुविधांयुक्त मुख्यालय प्रत्यक्षात साकार होणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्राला समाजामध्ये विशेष महत्त्व आहे. दररोज होणार्‍या घडामोडी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पत्रकार एक समाजहित माध्यम आहे. त्यामुळे मुख्यालयात पत्रकार कक्ष असणे गरजेचे आहे आणि ती गरज या नवीन इमारतीत पूर्ण होणार आहे आणि त्याचा पत्रकारांना फायदा होणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मौल्यवान मार्गदर्शन करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आभार.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply