नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल महापालिका स्वच्छता दूत असे प्रशस्तीपत्र देऊन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या कर्मचार्यांचा सन्मान महात्मा गांधी उद्यानात केला.
या वेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुले वाहुन नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थितांनी अभिवादन केले. पनवेल महापालिकाच्या वतीने कर्मचार्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर जयेश कांबळे, उदय पाटील, रोहन वाजेकर, सचिन कुलकर्णी व सर्व सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होते.