Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये ‘रयत’चा वर्धापन दिन उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या उरण फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 4) रयत शिक्षण संस्थेचा 102वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दुग्धशर्करा योग असा की याच शुभदिनी चालू शैक्षणिक वर्षातील शाळेची घंटा वाजली. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आणि संपूर्ण आशिया खंडात सर्वांत मोठी संस्था अशी ख्याति प्राप्त झालेली रयत शिक्षण संस्थेचा 102वा वर्धापन दिन महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे,  एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख  व्ही. के. कुटे आणि सर्व रयत सेवकवृंद यांच्या उपस्थित कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील हा शाळेचा पहिला दिवस असल्याने खर्‍या अर्थाने सर्व रयत सेवकांना आणि विद्यार्थ्यांना याचा आनंद झाला. विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक वृंदानी शाळेच्या पहिल्या दिवशी हजर असलेल्या सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट देवून त्यांचे स्वागत केले. प्राचार्य  एम. एच पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोरोना आजाराविषयी माहिती सांगत शाळेत आपण सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ग्रंथपाल डी. ए. घरत यांनी प्रत्येक वर्गात जाऊन पाठपुस्तकांचे वाटप केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply