सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोकडील विविध सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार सिडकोकडून तळोजा येथील दफनभूमी आणि स्मशानभूमी कामकाज महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 6) या स्मशानभूमी आणि दफनभूमींची अधिकार्यांसह पाहणी केली.
या पाहणी दौर्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, भाजप नेते निर्दोष केणी, वासुदेव पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, मजित फाय, रिया गामदुले, नासिर शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुस्लीम बंधूंना सर्व सुविधायुक्त दफनभूमी लवकरात लवकर मिळावी व त्या संदर्भातील कामे त्वरित करण्याबाबतचे आदेश या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना दिले.