Breaking News

आमदार महेश बालदी यांची नागरी सुविधांसाठी सिडको प्रशासनासोबत चर्चा

उरण : रामप्रहर वृत्त

नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड, करंजाडे, वडघर, चिंचपाडा, येथे मोठ्या प्रमाणाने नागरीकरण होत असल्याने येथील नागरिकांना सुख सोयी होणे गरजेचे आहे. त्यानुसार नोड विकसित करणे तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध विषयाबाबत उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्यासोबत सोमवारी (दि. 4) चर्चा केली. आमदार महेश बादली यांच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. उलवे नोड, करंजाडे, वडघर, चिंचपाडा, येथे सुख सोयींसंदर्भात झालेल्या सिडकोसोबतच्या बैठकीत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मान्य केले. या चर्चेच्या या वेळी उलवे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप उलवे नोड उपाध्यक्ष शैलेश भगत, युवा मोर्चा उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, उपाध्यक्ष धीरज ओवळेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर ओवळेकर, वहाळ ग्रापमपंचायत सदस्य रितेश म्हात्रे, यांच्यासह पदधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply