
गव्हाण-कोपर (ता. पनवेल) ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ घरत, विश्वनाथ कोळी, विजय घरत, वसंतशेठ पाटील, अनंता ठाकूर, रामदासशेठ ठाकूर, सुनील पाटील तसेच विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन तसेच सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.