पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोडमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवींचे दर्शन घेतले.
जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोपर, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व तामिळ संघम सेक्टर 19, लांगेश्वर मित्र मंडळ मोरावे आणि व्यापारी एकता मित्र मंडळ मोरावे यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाजाचे नेते उत्तम कोळी, युवा नेते मदन पाटील, निलेश खारकर, नितेश म्हात्रे, विशाल म्हात्रे, राजू खारकर, शैलेश भगत, अनुसया घरत, प्रिया अडसुळे, आरती तिवारी, प्रियांका शिंदे, कृष्णा सगादेवन, शेखर नडार, शिवकुमार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सर्वत्र धार्मिक वातावरण आहे. अनेकांच्या घरी देवीचे घट बसले असून मंडळांच्या वतीने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …