Breaking News

कांस्यपदकविजेत्या सुभाष पुजारी यांचा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या हस्ते गौरव

पनवेल : वार्ताहर

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा 2021मध्ये भारतासह महाराष्ट्र व नवी मुंबई पोलीस दलाचे नाव उंचावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी उजबेकीस्तान येथील स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्याबद्दल त्यांचे पनवेलचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला. या वेळी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यासह पत्रकार संजय कदम, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष पुजारी यांनी या स्पर्धेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. याचा आम्हाला गर्व असून आगामी काळातही त्यांनी अशा वेगवेगळ्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन भारताचे नाव उंचवावे, अशा शुभेच्छा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या वेळी पुजारी यांना दिल्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply