Breaking News

अलिबागमध्ये ऑनलाईन फसवणूक

महिलेला दीड लाखाचा गंडा

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबागमध्ये ऑनलाइन मद्य खरेदीत एका महिलेची दीड लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अलिबागमधील एका महिलेच्या कुटुंबात लग्न ठरले होते. लग्न सोहळ्यातील हळदी समारंभास येणार्‍या पाहुण्यांसाठी मद्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी महिलेने पीके वाईन्स या पेजवर असलेल्या मोबाइल नंबरवर फोन केला. त्याच्यात बोलाचाली होऊन मद्याचा व्यवहार ठरला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने महिलेला आपल्या खात्याची माहिती देऊन ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर वारंवार एकूण एक लाख 44 हजार रुपये खात्यात जमा करवून घेतले.

पैसे देऊनही मद्य मात्र घरी आले नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच या महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply