- वर्षा ठाकूर, वैशाली आवाडेंची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.22) आयोजित केला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुख
उपस्थिती लाभली.
आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि जागतिक सहकार वर्षाच्या निमीत्ताने सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने संवाद सहकाराचा सन्मान नारीशक्तीचा या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा सोहळा मार्केट यार्ड मधील श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला.
या वेळी कमळ नागरी सहकारी पतपेठीच्या अध्यक्षा मालती आंग्रे, सहकार भारतीच्या सहकाय्यक निबंधक भारती काटुळे, दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर अभियान व्यवस्थापक विनया म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यावर्ती सहकारी बँकेच्या शाखा अधिकारी सुशीला घासे, बचत गट संघटक स्वप्ना साखरे, सारस्वत बँकेच्या ज्युनियर ऑफिसर स्वाती चिंचोलीकर, सुलोचना किनगी, कर्ज वसुली ईधकारी अनिता डुंबरे, सुवर्णा तोंडुलकर, डॉक्टर नीलिमा मोरे, शिवनेरी महिला बचत गट, छत्रपती महिला ग्राम संघ विचुंबे, रायगड महिला बचत गट नवीन पनवेल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा वैशाली आवाडे, आम्ही उद्योगिनीच्या अध्यक्षा शुभांगी तिरोडकर, वर्षा ठाकूर, मोहिनी पाटील, दीपा राऊत, सहकार भारतीच्या पनवेल महानगर अध्यक्षा त्रिवेणी सालकर, महिला प्रमुख अपर्णा नाडगौडी, पल्लवी कोठावदे, कीर्ती जोशी, पनवेल शहर प्रमुख सुधीर नाडगौडी, उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय पावस्कर, सचिव किरण शिंदे, संघटन प्रमुख विश्वास शिंदे, स्मिता शेडगे आदी उपस्थित होते.
Check Also
शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा
नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …
RamPrahar – The Panvel Daily Paper