पनवेल ः प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. त्यामुळे पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 14) सुनावणी होणार होती, पण सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. गोन्साल्वीस यांनी पाटील यांची कोठडी वाढविण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने सुनावणीला स्थगिती देत पाटील यांची कोठडी आणखी सहा दिवसांनी वाढविली आहे.