Breaking News

महिला सुरक्षा कायदे कडक करा

मुरूड भाजप महिला मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन

मुरूड : प्रतिनिधी – महिला सुरक्षितेबाबतचे कायदे अधिक कडक करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुरूड तालुका भाजप महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदन करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी हे निवेदन स्वीकारले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडांचे सत्र सुरु आहेत. कोरोना महामारीच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पीटलमध्येही महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. प्रदेश भाजप महिला मोर्चाने महिला अत्याचाराच्या  घटनांचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदने दिली आहेत. मात्र त्याची साधी दखलसुध्दा घेण्यात आली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रीय हेच स्पष्ट होते. या सरकारचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रदेश भाजप महिला मोर्चाने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. त्याची राज्य सरकारने दखल घेऊन महिला सुरक्षेबाबत त्वरित कडक कायदे करावेत व त्याची कठोर अंमलबजाणी करावी, अशी मागणी मुरुड तालुका महिला मोर्चा तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

मुरूड तालुका भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा सुचिता घाग यांनी सोमवारी हे निवेदन तहसिलदारांना दिले. भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष विनोद भगत, सरचिटणीस नरेश वारगे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा माधुरी मुंबईकर, तालुका अध्यक्षा सुचिता घाग, सोनाली बुल्लू, श्रमिका खोत, नैनिता कर्णिक, राजेंद्र सुतार, शहर अध्यक्ष उमेश माळी, जीवन सुतार, संजय खोत, सुरेंद्र गिरणे, जयेंद्र भणगे, काशिनाथ गाणार, राजेंद्र सावंत, मंगेश भोईर, नसीम हनीफ उलडे, संजय खोत यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अटी, नियम व शर्तीचे पालन करून सदर निवेदन देण्यात आले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply